राष्टवादीच्या त्या १८ नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी ? शरद पवार निर्णय घेण्याची शक्यता

Foto

अहमदनगर- महापौरपदाच्या निवडणुकीत पक्षनेतृत्वाला अंधारात ठेवून परस्पर भाजपशी हातमिळवणी करणाऱ्या  राष्ट्रवादी काँग्रेसच्या १८ नगरसेवकांना  पक्षातून काढून टाकण्याचा निर्णय राष्ट्रवादी  काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारयांनी घेतला असल्याचे समजते. ते लवकरच या संदर्भात निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.  या १८ नगरसेवकांच्या पाठिंब्यावर अहमदनगर पालिकेत भाजपचा महापौर व उपमहापौर निवडून आला होता. त्यामुळे राष्ट्रवादी हि भाजपची 'B' टीम असल्याचा संदेश समाजात गेला होता.   यामुळे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला फटका बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी या नगरसेवकांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यामुळे चौकशी अहवालाची वाट न पाहता पक्षाने गेलेली पत परत मिळवण्यासाठी बंडखोर नगरसेवकांना पक्षातून काढून टाकायचे ठरवले आहे.

 

अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत २४ जागा मिळवत शिवसेना सर्वाधिक मोठा पक्ष ठरला होता. तर भाजपचे १४ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे १८ नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे शिवसेना मतांची जुळवाजुळव करून पालिकेत आपला महापौर बसवेल, असा अंदाज होता. परंतु, तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस आणि बसपाच्या मदतीने महापौरपदाच्या निवडणुकीत बाजी मारली.

 

यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तात्काळ स्थानिक नेत्यांच्या निर्णयाविषयी नाराजी व्यक्त केली होती. पक्षाकडून भाजपशी युती करण्याचे कोणतेही आदेश दिले नव्हते. मात्र, काही नगरसेवकांनी परस्पर निर्णय घेत भाजपशी हातमिळवणी केली. याप्रकरणी राष्ट्रवादीच्या सर्व नगरेसवकांना पक्ष नेतृत्वाकडून कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात येणार आहे. तसेच भाजपला पाठिंबा देणे चुकीचे असून चौकशी करून संबंधितावर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला होता.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker